व्हॉट्सऍप कट्टा   

आज जागतिक 
पुस्तक दिन. या निमित्त...
पुस्तक
हे शारदे सरस्वती 
व्यथा तुम्हा सांगू किती 
घरोघरी कपाटात 
बंद आहे माझी स्थिती
 
रजा द्यावी लेखणीस 
शोभा माझी होण्याआधी
ज्ञानमार्ग बदलावा 
गोष्ट तुम्हाठायी साधी
 
जिवापाड सांभाळली
मी चार वेदांची कुळे
पान पान जिर्ण झाले  
अक्षरांच्या ओझ्यामुळे 
 
कुणी यावं हाताळवं
कधी चाळुनी बघावं
दुसर्‍याच्या नावावर 
निरंतर मी जगावं
 
र्‍हस्व दीर्घ वृत्त छंद 
व्याकरणाचे निर्बंध
खाणाखुणा साहित्याच्या 
माझ्या हृदयात बंद
 
कितीतरी भावनांना
दिला शुद्ध न्याय चोख
सवलतीत मी सदा
किंमत ना कळे रोख
 
काळ एक होता नेक
माझ्यावरी त्याची भिस्त 
तोच कली उलटता
गेली वाचनाची शिस्त 
 
सुभाषिते सुविचार 
ओव्या श्लोक भारंभार 
कशापायी भार वाहू
वाचायाची मारामार 
 
कोणासाठी मी जगावे 
नाही मज कुणी वाली
रद्दी मोल जगण्याची 
माझ्यावरी वेळ आली 
 
नको तारू इंद्रायणी
शांत मृत्यू मज हवा
ज्ञानमयी पृष्ठ माझी
अर्थासहित संपवा
 
- प्राची गडकरी, डोंबिवली, 
मो. ९९८७५६८७५०

Related Articles